सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने दिवंगत अभिनेत्याचा एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुशांत सिंह राजपूत 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे शूटिंग करत असतानाचा हा फोटो आहे.
14 जून 2020 रोजी सकाळी जेव्हा लोक झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांना ही वाईट बातमी ऐकून धक्काच बसला. ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाची दु:खद बातमी होती. त्याच्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही त्याचे चाहते त्याची मनापासून आठवण काढतात. अलीकडेच, अभिनेत्याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने तिचा भाऊ सुशांत सिंहचा एक अनसीन आणि थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जे पाहून चाहते भावूक झाले.
बहीण कीर्ती सिंहने शेअर केलेला हा फोटो सुशांत सिंग एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी शूटिंग करत होता तेव्हाचा आहे. फोटोमध्ये, सुशांत त्याच्या कॉस्टार्ससोबत बाईकवर पोज देताना दिसत आहे आणि त्याची आयकॉनिक MSD हेअरस्टाईल फ्लॉंट करत आहे.
हा जुना फोटो शेअर करत श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- भावाचा हा सुंदर फोटो कोणीतरी पाठवला आहे, त्याचे चमकणारे स्मित पाहून माझे मन आनंदित झाले @sushantsinghrajput #OurheartbeatSushantSinghRajput.
श्वेताची एसएसआरची ही पोस्ट पाहून चाहते भावूक झाले. अभिनेत्याच्या एका चाहत्याने लिहिले - सुशांतचे स्मित देवासमोर पेटलेल्या दिव्यासारखे आहे, जे शुद्ध आणि दिव्य आहे.
तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, हा फोटो पाहून असे वाटते की, हा चित्रपट आपण कालच पाहिला आहे. अभिनेत्याचा अप्रतिम अभिनय एक आश्चर्यचकित करणारा होता..