लगान, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, यासारख्या कित्येक चित्रपटांना आपल्या कलादिग्दर्शनाचा साज चढवून प्रसिद्ध झालेल्या नितीन देसाई यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. कलाविश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गेल्या तीन दशकांपासून देसाई यांनी आपल्या कला दिग्दर्शनानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. १९४२ पासून अ लव स्टोरी या चित्रपटानं त्यांच्या करिअऱची सुरुवात केली होती.
कर्जत मध्ये देसाई यांचा स्टुडिओ होता. तो त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध होता. आता त्या स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ हिंदीच नाहीतर मराठी आणि इतर भाषांमधील चित्रपटांचे कलादिग्दर्शन केले होते.
नितिन देसाई यांच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी 1942 अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं. त्यांचे जाणे हे बॉलीवूड, मराठी चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झासं आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.