बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जोरदार सुरू आहे. हे पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रत्येक आठवड्याला काही ना काही घडतं आहे. 'बिग बॉस OTT 2' च्या फिनालेला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. घरातील स्पर्धकही कमी झाले आणि आता फायनल पर्यंत कोण कोण शोमध्ये राहणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहे. या आठवड्याचा विकेंड का वार खूप खास होता. कारण या आठवड्यात झालेले वादविवाद आणि स्पर्धकांमधील गैरसमज सलमानने कमी केले.
'विकेंड का वार'मध्ये रॅपर एमीवे बंटाई हा शोमध्ये दिसला. त्याने त्याच्या गाण्यावर प्रेक्षकांना नाचवलं आणि खूप मनोरंजनही केलं. या आठवड्यात प्रमोशनसाठी श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा आले होते. त्यांनी त्यांची नवी वेबसिरिज 'कलकूट' चं प्रमोशन केलं.
कॉमेडियन भारती सिंग हिने देखील या एपिसोडमध्ये खूप मजा केली. तिने सर्व स्पर्धकांना पोट धरुन हसवले मात्र त्यासोबत तिने असं काही केलं कि त्यामुळे जिया अन् अभिषेकचे चाहते खूप खुश झाले. बिग बॉस ओटीटीच्या या 'वीकेंड का वार' कॉमेडियन भारती सिंग पाहूणी बनून आली आणि तिने खूप सारे गेम खेळले.
या गेममध्ये भारतीने स्पर्धकांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या सर्वात आवडत्या व्यक्तीला त्या वस्तू भेट द्यायला सांगितल्या. यावेळी जिया शंकरला भारतीने एक अंगठी दिली. भारती तिला सांगते की ज्या व्यक्तीसोबत तूला रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे त्याला ती अंगठी दे. तेव्हा जिया लाजत अभिषेक मल्हानला बोलावते. तो लाजत स्टेजवर येतो.
दोघेही एकमेकांना पाहून खुपच लाजतात. मग अभिषेक गुडघ्यावर बसून जियाच्या बोटात अंगठी घालतो. हे सगळं पाहिल्यानंतर घरातील काही सदस्य हैराण होतात तर काही टाळ्या वाजवून दोघांना शुभेच्छा देतात.
गेल्या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये बरेच वाद निर्माण झाले होते. मात्र त्यापुर्वी त्याच्यात चांगले संबध होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडत होती. गैरसमजामुळे त्यांच्यात वाद झाले मात्र सलमान खानने ते मिटवले.
आता पुन्हा दोघांमध्ये मैत्री झाल्याचं दिसत आहे. आधीही दोघांमध्ये काहीतरी शिजतयं अशी चर्चा रंगली होती. दोघांचा डान्सही खुप व्हायरल झाला होता. त्यानंतर जियाने अभिषेकसाठी 'छुपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता' हे गाणे निवडलं होते. या गाण्यावर दोघेही एकत्र डान्स करताना दिसले. आता जिया आणि अभिषेक मल्हान यांच्यातील प्रेम आणखी फुलेल अशी आशा दोघांचे चाहते व्यक्त करत आहेत.