मुमताजची मुलगी नताशा आणि फिरोज खानचा मुलगा फरदीन खान यांचा 2005 मध्ये विवाह झाला आणि दोघांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींचे नाते व्याह्यांमध्ये रुपांतरीत झाले. फिरोज आणि मुमताज खूप चांगले मित्र होते आणि त्यांच्या मुलांच्या नात्यातून त्यांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात केले.
पण आता मिळालेल्या माहितीनुसार फरदीन आणि नताशामध्ये काहीच आलबेल नाही. दोघेही गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. नताशा लंडनमध्ये राहते आणि फरदीन मुंबईत.
फरदीन आणि नताशा यांना त्यांचे लग्न मोडायचे आहे, परंतु दोघांनीही अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वृत्तानुसार, या मुद्द्यावर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की, सध्या काहीही बोलू इच्छित नाही.
या जोडप्याला दोन मुले आहेत - एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांमधील मतभेदाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु दोघांना आता 18 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवायचे आहे.