स्प्रिंग रोल
साहित्य : सारणासाठी : (उभ्या पातळ चिरलेल्या भाज्या) 1 कप फरसबी, 1 कप गाजर, 1 कप कोबी, 2 कांद्याच्या पाती, 1 सिमला मिरची, 2 चिमूट अजिनोमोटो, 2 टेबलस्पून चिली सॉस, 1 टीस्पून सोया सॉस, 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
पारीसाठी : 1 कप मैदा, अर्धा कप दूध, 1 टेबलस्पून तेल.
पेस्टसाठी : अर्धा कप मैदा व पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा.
कृती : कढईत तेल गरम करून कांद्याची पात परतून घ्या. नंतर यात सर्व भाज्या, मीठ व अजिनोमोटो घालून 3-4 मिनिटे शिजवून घ्या. त्यात चिली सॉस व सोया सॉस घालून चांगले एकत्र करा आणि थंड होण्यासाठी ठेवा. पारीचे सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या. याच्या लहान लहान चपात्या लाटून घ्या. त्यामध्ये सारण भरून रोल तयार करा. तयार केलेली पेस्ट कडांना लावून, कडा चिकटवून घ्या. हे रोल गरम तेलात तळून घ्या. स्प्रिंग रोलचे साधारण दीड-दोन इंचाचे तुकडे करून हिरवी चटणी व सॉससह सर्व्ह करा.