रंगिला वडा
साहित्य : 4 टोमॅटो, 2 कप उकडून कुसकरलेला बटाटा, 1 कप बेसन, दीड टेबलस्पून हिरवी मिरची-लसूण पेस्ट, पाव टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 टूथपिक, तळण्यासाठी तेल.
कृती : बेसन, मीठ, सोडा व हळद एकत्र करून त्यात पाणी मिसळा व पेस्ट तयार करा. आता उकडलेल्या बटाट्यात मीठ, लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून चांगले एकजीव करा. टोमॅटोचा वरचा भाग काढून बाजूला ठेवून द्या. चमच्याने अलगद टोमॅटोमधील गर काढून घ्या. त्यात बटाट्याचे मिश्रण भरून त्यावर टूथपिकने टोमॅटोचा वरचा भाग लावा. हे टोमॅटो बेसनाच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात तळून घ्या. टूथपिक काढून वड्याचे मधोमध दोन भाग करा. रंगिला वडा तयार.