दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम नुकतेच पालक झाले आहेत. प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमुळे त्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागल्याने त्यांचे बाळ सोमवारीच घरी आले. दीपिका आणि बाळाचे घरामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. या दरम्यान घरातील सदस्य खूप भावूक झालेले पाहायला मिळाले. शोएबच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झालेले. आता या जोडप्याने बाळाचे बारसेदेखील केले आहे.
दीपिका आणि शोएबने आपल्या बाळाचे नाव रुहान इब्राहिम ठेवले आहे. दोघांनी त्यांच्या व्लॉगमध्ये याचा खुलासा केला आहे. दीपिका आणि शोएब अनेकदा त्यांच्या व्हलॉग्सद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले राहतात. त्यातून ते त्यांच्या सर्व गोष्टी येथे शेअर करतात.
दीपिकाने नुकताच तिचा गरोदरपणाचा प्रवास आणि त्यासंबंधित सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. व्ह्लॉगमध्येच, अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नाव रुहान ठेवण्याबद्दल सांगितले होते आणि त्याचा अर्थ देखील सांगितला होता की रुहान म्हणजे दयाळू… अध्यात्मिक… पण हा व्लॉग अभिनेत्रीने काही वेळातच डिलीट केला. मुस्लिम नाव ठेवल्याबद्दल खूप ट्रोल केले गेले, म्हणून तिने ते हटवल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, काही वापरकर्ते असाही अंदाज लावत आहेत की कदाचित बाळाचे नाव व्ह्लॉगमध्ये चुकून समोर आले होते, म्हणूनच ते हटवले गेले.
या नामकरणामुळे दीपिकाला खूप ट्रोल केले जात होते आणि अनेकदा तिला ट्रोलिंगची शिकारही व्हावे लागले असले तरी सध्या ती तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. इंस्टाग्रामवर अनेक चाहते या नावावर खूप खूश आहेत आणि ते खूप गोंडस नाव असल्याचे सांगत आहेत.
दीपिका आणि शोएबची भेट ससुराल सिमरच्या सेटवर झाली आणि त्यानंतर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षानंतर आता ते आई-वडील झाले आहेत आणि खूप आनंदी आहेत.