चिकन अचारी कबाब
साहित्यः 500 ग्रॅम बोनलेस चिकन, अर्धी भोपळी मिरची, अर्धा कांदा, 3 चमचे दही, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पू्ड, 1 चमचा लोणच्याचा मसाला, 2 चमचे बटर, मीठ चवीनुसार.
कृतीः चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्याचप्रमाणे भोपळी मिरची व कांद्याचे मोठे तुकडे करावे. चिकनला दही, आले लसूण पेस्ट , लाल तिखट, गरम मसाला , काळी मिरी पूड, अचारी मसाला व मीठ लावून 1-2 तास मॅरिनेट करावेे. ह्या मधेच कांदा व भोपळी मिरची टाकून मॅरिनेट करावे. ओव्हन 250 डिग्रीवर 10 मिनिटे प्रीहिट करावा. कबाबसाठी वापरतात त्या सळ्या घेऊन त्या सळ्यांना थोडे बटर लावावे. प्रत्येक सळी मध्ये भोपळी मिरची, चिकन आणि कांदा ह्या क्रमाने लावावे. ह्या सळ्या ओव्हनमध्ये ठेऊन 250 डिग्री अंशावर 10 मिनिटे ठेवाव्यात. 10 मिनिटा नंतर ओव्हनमधून काढून बटर लावावे आणि परत ओव्हनमध्ये ठेवावे. 15-20 मिनिटात नंतर कबाब तयार होतील.