Close

अजमेरमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट ‘अजमेर 92’ चा टिझर प्रदर्शित…( Ajmer 92 Teaser Out)

इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले. १९९२ साली अजमेरमध्येही असा घृणास्पद खेळ उघडकीस आला होता. शाळा-महाविद्यालयांमध्ये सुमारे २५० मुलींवर सामूहिक बलात्कार झाला. त्यातही अनेक अल्पवयीन असून अनेक महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. हे भयंकर सत्य मांडणाऱ्या 'अजमेर 92' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

पुष्पेंद्र सिंग दिग्दर्शित हा चित्रपट १९८७ ते १९९२ या काळात राजस्थानमधील अजमेर येथील सुमारे २५० बलात्कार पीडितांच्या सत्य घटनांभोवती फिरतो.

https://youtu.be/D5ewCw-rfsY

'अजमेर 92' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जनता आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच निर्मात्यांनी त्याचा टीझर प्रदर्शित केला, जो थेट लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो. टीझरची सुरुवात एका फोनने होते आणि त्यानंतर काही मुली आत्महत्या करताना दाखवल्या जातात. आधी मुलींचे न्यूड फोटोशूट केले जाते आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते, असे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, या बलात्कार पीडित या बहुतेक शालेय आणि महाविद्यालयीन मुली होत्या.

चित्रपटाचा टीझर खूपच दमदार आहे. प्रेक्षक आधीच या चित्रपटाला सुपरहिट घोषित करत आहेत. १९९२ मध्ये अजमेरमध्ये शेकडो महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने देश हादरला होता. पत्रकाराच्या मदतीने या घाणेरड्या खेळाचा पर्दाफाश करण्यात आला. चित्रपटात मुख्य अभिनेता करण वर्मा पत्रकाराची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाबद्दल सांगायचं म्हणजे याच्या स्टारकास्टमध्ये कोणत्याही मोठ्या नावाचा समावेश नाही. बहुतेक नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पुष्पेंद्र सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर उमेश शंकर तिवारी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रिलिज होणाऱ्या चित्रपटांमुळे मनोरंजन कमी अन् वाद जास्त होत आहे. चित्रपटाचं पोस्टर, टिझर किंवा ट्रेलर येताच नव्या वादाला तोंड फुटतं. त्यात पठाण असो, आदिपुरुष असो किंवा द केरळ स्टोरी. नुकताच 72 हुरें या चित्रपटामुळे देखील असाच वाद रंगला होता. या चित्रपटाबाबतचा वादही निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Share this article