पावसाळ्यामुळे उकाड्याच्या उन्हाळ्यापासून अत्यावश्यक दिलासा मिळत असला तरी पावसाळ्यामध्ये अनेक संसर्ग व आजार देखील होतात. उदाहरणार्थ या सीझनदरम्यान सामान्यपणे बुरशीजन्य संसर्ग होतात.
बुरशीजन्य संसर्गांबाबत चार सामान्य गैरसमज, जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेत -
गैरसमज १ : घरगुती उपाय व स्वत:हून केलेला औषधोपचार त्वचासंबंधित आजारांवर उपचारासाठी पुरेसे आहेत
तथ्य : बुरशीजन्य संसर्गांवर उपचार करणे अधिक अवघड होत असल्यामुळे योग्य व वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत मुंबईतील डर्माट्री स्किन अँड हेअर क्लिनिकच्या डर्माटोलॉजिस्ट डॉ. प्रियल गाला म्हणाल्या, ''भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे देशात बुरशीजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहेत. व्यक्ती या संसर्गांवर उपचार घेण्याचा प्रयत्न करत असताना स्वत:हून औषधोपचार करण्याच्या आणि अँटी-फंगल औषधोपचाराचे पालन न करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यक्तींनी वेळेवर औषधोपचार आणि जीवनशैलीतील उपायांबाबत माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, जे बुरशीजन्य संसर्गांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक आहे.''
घरगुती उपाय आणि स्वत:हून औषधोपचार करण्यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला खाज सुटणाऱ्या बुरशीजन्य संसर्गाचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गैरसमज २: संसर्ग कमी होऊ लागले की उपचार थांबवता येऊ शकतो.
या गैरसमजला दूर करत अॅबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स डायरेक्टर डॉ. अश्विनी पवार म्हणाल्या, ''आमचा विश्वास आहे की, विज्ञानावर आधारित योग्य सोल्यूशन्ससह आरोग्याची उत्तमप्रकारे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बुरशीजन्य संसर्गांचा प्रभावीपणे उपचार करण्यासाठी व्यक्तींनी त्यांच्या अँटीफंगल उपचार योजनेचे योग्यरित्या पालन केले पाहिजे. यामध्ये औषधोपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे, सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे कमी होण्यास सुरूवात झाली तरी कोर्सचे पालन करणे महत्त्वाचे आहे. उपचाराचे काटेकोरपणे पालन केल्यास संसर्गाचे योग्यरित्या निर्मूलन होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासोबत आरोग्यदायी, त्रास-मुक्त जीवन जगता येऊ शकते.''
गैरसमज ३ : बुरशीजन्य संसर्ग फक्त उन्हाळ्यामध्ये होतात.
तथ्य : भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये उन्हाळ्यानंतर देखील आर्द्र व दमट वातावरण असलेल्या पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्गांचे प्रमाण वाढते.
तसेच, देशातील हवामानामधील विविधतेमुळे (जवळच असलेला समुद्र) विविध प्रदेशांमध्ये संसर्गांच्या प्रकारांमध्ये विविधता दिसून येते. टिनिया किंवा नायटा होण्यास कारणीभूत बुरशीची विशिष्ट प्रजाती टी. मेण्टाग्रोफाइट्स मुंबई व कोलकाता यांसारख्या किनारपट्टी शहरांमधील आर्द्र वातावरणामध्ये अधिक आढळून येते. दरम्यान अॅथलीटच्या पायांना होणारे इतर संसर्ग जसे जॉक इच व नायटा (टी.रूब्रम) दिल्ली, लखनौ व हैदराबाद अशा किनारपट्टी नसलेल्या शहरांमध्ये आढळून येतात.
गैरसमज ४: फक्त मुलांना बुरशीजन्य संसर्ग होतात
तथ्य : सर्व वयोगटातील व्यक्तींना बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका आहे. सामान्यत: ११ ते ४० वर्ष वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्गांचे प्रमाण उच्च आहे. तसेच, भारतातील पुरूषांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतात, ज्यांना महिलांच्या तुलनेत संसर्ग होण्याची शक्यता जवळपास दुप्पट आहे. तरुण पुरूष अधिक प्रमाणात शारीरिक व्यायाम करत असल्यामुळे घाम अधिक प्रमाणात येतो, हे संभाव्य कारण असू शकते. महिलांमध्ये कमी प्रमाण असण्यासाठी त्या डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याबाबत संकोच करत असण्याचे कारण असू शकते. पण महिला व मुलांसह सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये अशा संसर्गांच्या वाढत्या प्रमाणासह हे गैरसमज मोठ्या प्रमाणात दूर होत आहेत.