दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम नुकतेच आईबाबा झाले आहेत पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. दीपिकाच्या प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागले त्यामुळे प्रसूतीनंतरही दीपिकाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकला नाही. पण 21 जूनला मुलगा झाल्यानंतर सोमवारी, 10 जुलै रोजी अखेर दीपिका आणि शोएब त्यांच्या बाळाला घरी घेऊन आले.
जोडप्याने संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब व्लॉगवर अपलोड केला आहे, ज्यामध्ये दीपिका आणि शोएबच्या हातात त्यांचे बाळ असल्याचे दिसून येते. घर फुगे आणि फुलांनी सजले आहे आणि प्रत्येकजण लहान राजकुमाराची आतुरतेने वाट पाहत आहे.
बाळ घरी येताच प्रत्येकजण आनंदाने उडी मारतो. यात सर्वात भावनिक क्षण म्हणजे जेव्हा शोएबने बाळाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आणि बाळाचा चेहरा पाहून ते रडू लागले. दीपिकाच्या सासूबाईंचीही तीच अवस्था झाली होती आणि त्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. शोएबचे वडील भावूक होऊन वारंवार रडताना दिसले. शोएब त्यांना शांत करत होता.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी आलटून पालटून बाळाला घेतले आणि त्यानंतर केकही कापण्यात आला. वेलकम होम असे भिंतीवर लिहिले होते आणि खूप दिवसांनी घरात आनंदाचे वातावरण होते.
शोएब आणि दीपिकाला लग्नाच्या पाच वर्षांनंतर पालक बनण्याचे सुख मिळाले, दीपिकाने तिच्या प्री-मॅच्युअर डिलीव्हरीचा भयानक अनुभव देखील शेअर केला, बेडवर आणि तिच्या कपड्यांवर रक्त पाहून ती कशी घाबरली होती हे सुद्धा सांगितले.
पण आता सर्व काही ठीक आहे आणि बाळही घरी आले आहे. आई आणि बाळाच्या भव्य स्वागताने सर्वांच्या डोळ्यांत आनंदाची चमक स्पष्ट दिसत आहे.
मात्र, या जोडप्याने अद्याप बाळाचे नाव उघड केलेले नाही आणि त्याचा चेहराही दाखवलेला नाही. यावर दीपिका आणि शोएबने सांगितले की यावर आमचा विश्वास नसला तरी वडिलधाऱ्यांचे बोलणे आम्ही पाळू आणि काही काळ बाळाचा चेहरा दाखवणार नाही.