Close

केआरकेचा आता शहनाज गिल आणि नवाजवर निशाणा, पण युजर्सनी त्यालाच दाखवला आरसा (KRK again crosses his limits, Makes Lewd Remarks on Nawazuddin and Shehnaz)

नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल यांचा 'यार का साताया हुआ हा म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे. बी प्राक याने या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याच्या बोलांपासून ते बी प्राकच्या आवाजापर्यंत आणि शहनाज-नवाझुद्दीनची केमिस्ट्री सगळ्याच गोष्टी लोकांना एवढ्या आवडल्या आहेत की हे गाणे रिलीज झाल्यापासून यूट्यूबवर व्हायरल झाले आहे. पण केआरकेला हे यश पचनी पडत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने त्याने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी केआरकेने सर्व मर्यादा ओलांडत नवाज-शहनाजसाठी असे शब्द वापरले आहेत की, नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत.

  KRK म्हणजेच कमाल आर खान, जो स्वत:ला अभिनेता, चित्रपट निर्माता आणि सर्वात मोठा चित्रपट समीक्षक म्हणून ओळखतो, तो अनेकदा त्याच्या वादग्रस्त ट्विट आणि विधानांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींशी पंगा घेतो आणि त्यांच्याविरोधात उलटसुलट विधाने करून चर्चेत राहतो. आपल्या ट्विटमध्ये तो सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या हात धुवून पाठी लागलेला असतो. मात्र, यासाठी त्याला प्रचंड ट्रोलही करण्यात आले आहे. पण असे असूनही केआरके बॉलिवूडच्या कोणत्याही सेलिब्रिटीबद्दल चुकीचे बोलण्यापूर्वी विचार करत नाही किंवा मागेपुढे पाहत नाही. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शहनाज गिल यांच्यावर त्याने निशाणा साधला आहे.  

केआरकेला हे गाणे फारसे आवडले नाही. त्याने ट्विटरवर नवाज आणि शहनाजच्या केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या व्हिडिओ गाण्यावर प्रतिक्रिया देताना केआरकेने लिहिले, 'आज मी नवाजुद्दीन आणि शहनाज गिलचे गाणे पाहिले. अरे देवा ते भयंकर होते. नवाज नाचत आहे आणि शहनाज अभिनेत्री कमी आणि छिछोरी जास्त दिसते. या मुलीला अभिनय अजिबात कळत नाही.

कमाल आर खानचे हे ट्विट वाचून शहनाज आणि नवाजचे चाहते संतापले आहेत आणि त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. कमल आर खानने आधी आपल्या स्वताकडे डोकावून पाहावे असे म्हणत आहेत. नवाज आणि शहनाजचे चाहते कमाल आर खानला खूप शिव्या देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'सर, तुम्ही प्रसिद्ध आणि प्रतिभावान लोकांना सडलेले आणि काळे-पिवळे म्हणता... तुमच्या चेहऱ्याबद्दल आणि प्रतिभेबद्दलही काही सांगा... तुम्ही इतरांचे यश पाहू शकत नाही.' दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, 'वेडा आहेस का?? ते पहिल्या क्रमांकावर यशस्वीपणे चालू आहे आणि तेही जागतिक स्तरावर.. तुम्ही नेहमी इतरांचे वाईट चिंतता... शहनाजचा अभिनय उत्कृष्ट आहे... कृपया तुमचे गाणे आधी पहा..

Share this article