मोघलाई पराठा
साहित्य : सारणासाठी ः 1 कप राजमा (शिजवलेला), 1 कांदा (बारीक चिरलेला), 5 टेबलस्पून टोमॅटो प्युरी, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कणकेसाठी : 1 कप गव्हाचे पीठ, स्वादानुसार मीठ.
इतर : तेल.
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिर्याची फोडणी करा. त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट, मीठ व लाल मिरची पूड घालून परतवून घ्या. त्यात राजमा व टोमॅटो प्युरी घालून मिश्रण दाट होईपर्यंत परतवा. नेहमीप्रमाणे कणीक मळून, त्याची चपाती लाटा आणि एका बाजूने शेकून घ्या. दुसर्या बाजूवर राजमाचे मिश्रण घालून चपाती चारही बाजूने पाकिटाप्रमाणे दुमडून घ्या. चपातीच्या कडा पाण्याच्या साहाय्याने बंद करा. तव्यावर तेल सोडून त्यावर हे पराठे खमंग भाजून घ्या. गरमागरम मोघलाई पराठे दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.