लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याची मुलगी सितारा सध्या मीडियामध्ये चर्चेत आहे. ११ वर्षांच्या सिताराने आपल्या कामाने मोठमोठ्या आणि प्रसिद्ध स्टार किड्सना मागे टाकले आहे. सुपरस्टार महेश बाबू याची मुलगी सितारा घट्टामनेनी टाइम्स स्क्वेअरवर दिसणारी पहिली स्टारकीड बनली आहे. ती एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि ४ जुलै रोजी तिची एक जाहिरात न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आली होती. या बातमीची चर्चा अजूनही सुरूच होती तिथे आता सिताराबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. टाइम्स स्क्वेअरवरील त्या जाहिरातीसाठी सिताराने मोठं मानधन घेतलं आहे.
महेश बाबू हा जगभरात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या एका वेगळ्याच कारणामुळे तो आणि त्याची लेक चर्चेत आले आहेत. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याची मुलगी सितारा. सितारा आता केवळ ११ वर्षांची आहे. पण मानधनाच्या बाबतीत तिने अनेक स्टारकिड्सना मागे टाकलं आहे. एका ज्वेलरी ब्रँडची ॲम्बेसिडर म्हणून ४ जुलै रोजी तिची झलक टाइम स्क्वेअरवर दाखवण्यात आली. तिची ही जाहिरात आणि तिचे फोटो लगेचच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. या जाहिरातीसाठी तिने किती मानधन घेतलं हा आकडा आता समोर आला आहे.
या जाहिरातीमध्ये सितारा डिझायनर ड्रेस परिधान करून आणि साडी नेसून त्यावर भारतीय पद्धतीचे दागिने घालून फोटोसाठी पोज देताना दिसली. तिची ही जाहिरात टाईम स्क्वेअरवरही दाखवण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, या एका जाहिरातीसाठी तिने तब्बल १ कोटी मानधन घेतलं आहे. त्यामुळे सिताराचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
यानिमित्ताने सितारा टाइम स्क्वेअरवर झळकणारी पहिली भारतीय स्टारकिड ठरली आहे. याबाबतीत तिने सारा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान यांनाही मागे टाकलं आहे. ही महेश बाबुसाठी खरोखर अभिमानास्पद बाब आहे.