अजय देवगण आणि काजोल यांच्या नावाचा समावेश बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्समध्ये होतो. केवळ खऱ्या आयुष्यातच नाही तर रील लाईफमध्येही दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. काजोल इंडस्ट्रीमध्ये तिच्या आनंदी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते. काजोलने चित्रपटाच्या पडद्यावर अनेक अभिनेत्यांसोबत काम केले असले तरी या सर्वांमध्ये शाहरुख खान आणि काजोलची जोडी सुपरहिट ठरली आहे. अजय देवगणला पत्नी काजोल आणि शाहरुख खानच्या केमिस्ट्रीचा हेवा वाटत होता, त्यामुळे त्याने काजोलला शाहरुख खानसोबत काम न करण्याची तंबी दिली होती, असं म्हटलं जातं.
काजोल आणि अजय देवगणने लग्नाआधी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर काजोल आणि अजय देवगणने 1999 मध्ये लग्न केले. लग्नानंतर एक वेळ अशी आली की अजयने काजोलला शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिला.
काजोल आणि अजय देवगणने 'इश्क', 'प्यार तो होना ही था' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु काजोल आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर नेहमीच आवडते. काजोल आणि शाहरुख खानने 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांची क्रेझ इतकी होती की त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती.
जेव्हा या दोघांची जोडी पडद्यावर सुपरहिट झाली होती, तेव्हा अशीही बातमी आली होती की अजय देवगणला त्याची पत्नी काजोल आणि शाहरुख खान यांच्यातील केमिस्ट्रीचा हेवा वाटत होता, त्यामुळेच त्याने काजोलला शाहरुख खानसोबत काम न करण्याची सूचना केली होती. एका मीडिया रिपोर्टनुसार, लोक काजोल आणि अजयपेक्षा काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीची चर्चा करायचे, ज्यामुळे अजय नाराज झाला आणि त्याने पत्नी काजोलला शाहरुखसोबत काम करू देण्यास नकार दिला.
मात्र, एका मुलाखतीत शाहरुख खानला याबाबत विचारण्यात आले असता, अजयने अशी कोणतीही अट घातली आहे, असे मला माहित नसल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. अजयच्या नकारामुळे काजोल माझ्यासोबत काम करणार नसेल तर मी तिच्या निर्णयाचा आदर करेन, पण अजयने काजोलला असं काही म्हटलं असेल असं मला वाटत नाही. यासोबतच किंग खान म्हणाला होता की, जर माझी पत्नी गौरी ही काजोलसारखी अभिनेत्री असेल तर मी तिला कधीच सांगणार नाही की तिने कोणासोबत काम करावे आणि कोणासोबत करू नये.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती जवळपास तीन दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि तिच्या फिल्मी करिअरमध्ये तिने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठ्या पडद्यावर तिची मोहिनी पसरवल्यानंतर आता काजोल ओटीटीवर पदार्पण करत आहे. ती लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारच्या 'द ट्रायल' या सीरिजमध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.