भूमी पेडणेकरने आपला लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा व्हायरल झालेला फोटो पाहून भूमी पेडणेकरने ओठांवर शस्त्रक्रिया करून चेहऱ्यात काही बदल केला असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
व्हायरल झालेल्या भूमी पेडणेकरच्या फोटोंमध्ये तिचा बदललेला चेहरा आणि ओठ पाहून, सोशल मीडिया वापरकर्ते अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर ओठांची शस्त्रक्रिया केली असा अंदाज लावत आहेत. फोटो पाहून नेटिझन्स तिला खूप ट्रोल करत आहेत.
याशिवाय अभिनेत्रीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे ओठ अगदी वेगळे दिसत आहेत. या लूकवर यूजर्स भूमीला ट्रोल करत आहेत.
भूमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणतीही पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करत असली तरी युजर्सचे लक्ष आपोआप तिच्या ओठांकडे जाते आणि यूजर्स तिच्या कारनाम्यावर कमेंट करत असतात.
लिप सर्जरीच्या काही दिवस आधी भूमी बिल्डर यश कटारियासोबत स्पॉट झाली होती. मीडियाला पाहताच यश लपून भूमीच्या गाडीत बसला.