मटार पराठा
साहित्य : सारणासाठी : 1 कप मटार, चिमूटभर जिरे, थोडे साजूक तूप, स्वादानुसार मीठ.
कणकेसाठी : 2 कप गव्हाचे पीठ, थोडे साजूक तूप, कोमट पाणी, स्वादानुसार मीठ.
इतर : बटर.
कृती : पाण्यात मीठ घालून उकळवत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात मटार घालून अर्धवट शिजवून घ्या. शिजलेल्या मटारांवर लगेच थंड पाणी घालून, ते धुऊन घ्या. अर्धवट शिजवलेले मटार साधारण भरडून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्यात जिरे परतवा. नंतर मटार व (आवश्यकता असल्यास) मीठ घालून चांगले एकजीव करून, 2 मिनिटे शिजत ठेवा. गव्हाच्या पिठात मीठ आणि तूप एकत्र करून कोमट पाण्याने मऊ कणीक मळून घ्या. या कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, त्यात मटारचे मिश्रण भरा आणि पराठे लाटून घ्या. हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर लावून खमंग भाजून घ्या. गरमागरम मटार पराठा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा.