पुष्पामध्ये श्रीवल्ली म्हणून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रश्मिकाबाबत नवी माहिती समोर आली आहे. रश्मिता तशी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. पण आता तिची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. रश्मिकासोबत खूप काळ काम करणाऱ्या मॅनेजरने तिची ८० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे, त्यानंतर अभिनेत्रीने मॅनेजरला कामावरून काढून टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, रश्मिका मंदानाने तिच्या मॅनेजरला ताबडतोब काढून टाकले. ती अभिनेत्रीच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिचे काम पाहायची.
मिळालेल्या माहितीनुसार मॅनेजरने रश्मिका मंदानाची ८० लाखांची फसवणूक केली आहे. अभिनेत्रीने अद्याप या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्टमध्ये एका सूत्राने सांगितले की, 'रश्मिकाची तिच्या मॅनेजरने ८० लाखांची फसवणूक केली आहे. मात्र अभिनेत्रीला या प्रकरणाचा कोणत्याही प्रकारे गाजावाजा करायचा नव्हता. म्हणून, तिने आपल्या मॅनेजरला काढून टाकले आणि इतर सर्व गोष्टी स्वतः हाताळल्या.
रश्मिका मंदानाचे आगामी चित्रपट रश्मिका येत्या काळात अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला असून रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही त्यात भूमिका आहेत. ११ ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे. रश्मिका सध्या 'पुष्पा: द रुल' फ्रँचायझीसाठी शूटिंग करत आहे