‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच झाला. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांनी केले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार – रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब चौधरी तसेच गायिका सावनी, संगीतकार साई-पियुष इत्यादी हजर होते.
या चित्रपटाला शुभेच्छा देताना अशोकमामा म्हणाले, “या चित्रपटात सहा अभिनेत्रींना एकत्र पाहणं ही मोठी मेजवानी आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल व प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.”
या प्रसंगी पारंपरिक मंगळागौर नृत्य सादर करण्यात आले. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत माधुरी भोसले निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते केदार शिंदे व अजित भुरे आहेत. तो ३० जूनला प्रदर्शित होईल.