उपवासाच्या दिवशी साबुदाणा आणि वरी यांपासून झटपट बनणारा व चवीला स्वादिष्ट असणारा हा पदार्थ जरुर करून पाहा.
साहित्य - अर्धा कप साबुदाणा, १ टीस्पून वरी, दीड टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, पाव वाटी शेंगदाण्याचा कुट, २ टीस्पून कोथिंबीरची पेस्ट, सैंधव मीठ चवीनुसार, पाव कप पाणी, तळण्यासाठी तेल, थोड्या चेरी.
कृती - साबुदाणा अर्धा तास भिजवून ठेवा. एका पॅनमध्ये वरीचे तांदूळ, हिरवी मिरची आणि पाणी घालून शिजवा. वरीच्या मिश्रणामध्ये शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कोथिंबीरची पेस्ट आणि साबुदाणा घालून बॉल्स बनवा. गरम तेलामध्ये तळून घ्या. वरुन चेरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied