साहित्य – अर्धा किलो बोनलेस चिकन, १ किलो बासमती तांदूळ, २५० ग्रॅम कांदा, २५० ग्रॅम टोमॅटो, प्रत्येकी २५ – २५ ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम कोथिंबीर, ५० ग्रॅम खसखस, ५० ग्रॅम काजू, २५ ग्रॅम चिरौंजी, थोड्या भोपळ्याच्या बिया, २ छोट्या वेलच्या, २ मोठ्या वेलच्या, २ तमालपत्र, १ तुकडा दालचिनी, ५ लवंगा, मीठ चवीनुसार, ५० ग्रॅम तूप वा तेल, २ टीस्पून गरम मसाला, २ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरेपुड
सजावटीसाठी – पातीचा कांदा, ऑमलेट किंवा उकडलेलं अंड
कृती – जिरं, कोथिंबीर, खसखस, काजू, भोपळ्याच्या बिया आणि चिरौंजी वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या. एका हंडीमध्ये तेल गरम करा. त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि कांदा घालून हलकेच परता. त्यात कापलेले टोमॅटो घाला. आता त्यात मीठ, हळद, जिरेपुड, व गरम मसाला घालून परतवा. भांड्यात तेल सुटू लागले की जिरं, कोथिंबीर, खसखस, बिया व चिरौंजी यांची पेस्ट घाला. २-३ मिनिटानंतर त्यात चिकन घालून १५-२० मिनिटं शिजवा. पाणी घालून शिजू द्या. चिकन अर्धवट शिजले की त्यात तांदूळ घाला. तांदळातील पाणी सुकले की हंडीला दम लावून १५ मिनिटं मंद आचेवर शिजवा. चिरलेला पातीचा कांदा आणि ऑमलेट किंवा उकडलेल्या अंड्याने सजवून गरमागरम सर्व्ह करा.