दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लवकरच आई-वडील होणार आहेत. अनेकदा हे कपल सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अलीकडेच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांचा नवीनफोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिकाची प्रेग्नेंसी ग्लो पाहून गौहर खानने दीपिकाला एक गोड मुलगी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
नुकतेच दीपिकाने तिचा नवीन फोटो इंटरनेटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिकाने एक ब्रीझी टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केलेली दिसत आहे. या फोटोत तिचा पती शोएब इब्राहिमही तिच्यासोबत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉंट करत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले - तू माझ्या शेजारी ,माझे जग हसते @shoaib2087 "
दीपिका आऊट शोएबचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. दीपिकाने हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक करायला सुरुवात केली, दीपिकाची मैत्रीण गौहर खानने तिच्या या फोटोवर कमेंट केली. कमेंट करताना गौहर खानने लिहिले – मला असे वाटते की, दीपिकाला एक सुंदर मुलगी होईल. अभिनेत्री गौहर खानने गेल्या महिन्यातच एका मुलाला जन्म दिला आहे.
गौहरच्या या कमेंटवर एका चाहत्याने लिहिले - माशा अल्लाह ❤️❤️ मला वाटतं तो मुलगा असेल, मी तिच्यासाठी मुलाचा अंदाज केला होता. बरं, कोणीही असो पण ते बाळ निरोगी असून देत .