‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि ‘दहाड’ फेम अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) सध्या चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील केलं गेलं आहे. अखेर आता तमन्नाने विजयसोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.
गोव्यातील एका पार्टीनंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले. दोघांचाही पार्टीमध्ये लिपलॉक केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची सतत चर्चा होत होती. या कपलला अनेकवेळा एकत्र स्पॉट केलं होतं. तरी सुद्धा दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही भाष्य केलं नव्हतं.
नुकतंच तमन्नाने त्यांच्या रिलेशनवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे, ती म्हणते, “मला वाटत नाही की तुमचा तो सहकलाकार असल्याने तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता. आजवर मी माझ्या सिनेकारकिर्दित अनेक अभिनेत्यांसोबत काम केलंय. माझ्या मते एखाद्याच्या प्रेमात पडणं किंवा एखाद्यासाठी मनात काही भावना येणं ही नक्कीच अत्यंत वैयक्तिक बाब आहे. ते काय काम करतात, याच्याशी त्याचं काहीच घेणं-देणं नाही. एखाद्याची नोकरी किंवा व्यवसाय पाहून प्रेम केलं जात नाही.”
सोबतच तमन्नाने जेव्हा विजयसोबतच्या नात्यावर भाष्य केले, ती म्हणते, “माझं आणि विजयचं नातं खूप खास आहे. भारतात आपल्या जोडीदारासाठी अनेक गोष्टी बदलव्या लागतात. पण विजयने मी जशी आहे तसेच मला स्विकारलंय. तो माझ्यासाठी खूपच खास असून तो नेहमीच माझी काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदीत राहण्याचं कारण झाला आहे.”
तमन्ना आणि विजय लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. दोघांचा एकत्र हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्यांची पहिली भेट देखील ‘लस्ट स्टोरीज २’ च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मित रविंद्रनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर बाल्कि आणि सुजॉय घोष यांनी एकत्रित केले होते. आता दोघांचेही चाहते त्यांचा लग्नासोबतच आगामी चित्रपटाचीही उत्सुकता आहे.