Close

अंकिता लोखंडे आणि विकी जैनला स्वप्नातील घरात घरप्रवेश करुन झालं एक वर्ष, अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो (Ankita Lokhande & Vicky Jain complete one year in their dream home, share adorable photos)

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखडे आणि विकी जैन यांना त्यांच्या 'ड्रीम होम'मध्ये प्रवेश करुन एक वर्ष झाले आहे. या आनंदात अभिनेत्रीने घरात पूजा ठेवली होती. अंकिताने पूजाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे मनोरंजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. जोडपे अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अपडेट्स त्यांच्या चाहत्यांसह इंटरनेटवर शेअर करतात.

 नुकतेच अंकिता आणि विकीने 10 जून रोजी त्यांच्या आलिशान ड्रीम हाउसमध्ये राहून एक वर्ष पूर्ण केले आहे.

अभिनेत्रीने हा खास आनंद वेगळ्या अंदाजात साजरा केला. या खास प्रसंगी अंकिता आणि विकीने त्यांच्या घरी पूजा ठेवली होती. ज्यामध्ये कपलने त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांना आमंत्रित केले होते.

अलीकडेच अंकिताने पती विकी जैनसोबतचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, हे जोडपे पारंपारिक पोशाख परिधान करून अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

हे मनमोहक फोटो शेअर करताना अंकिताने त्यासोबत एक अतिशय सुंदर नोटही लिहिली आहे. नोटमध्ये अभिनेत्रीने लिहिले- आम्ही एका वर्षापासून आमच्या आनंदाच्या ठिकाणी राहत आहोत. पहा वेळ कसा भूर्रकन उडून गेला. तू माझ्यासाठी हे घर विकत घेतलंस तेव्हा तू किती उत्साही आणि आनंदी होतास ते मला अजूनही आठवतं. कारण मुंबईतलं हे आमचं पहिलं ड्रीम होम होतं.

अंकिता म्हणाली- शेवटी आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो.. किती सुंदर आणि अविस्मरणीय दिवस होता तो.. तो दिवस होता 10 जून 2022.. आणि काल म्हणजे 10-6-2023 ला आम्हाला हे समजलं. आम्हाला हॅप्पी प्लेसला शिफ्ट होऊन एक वर्ष झालं!!! हे दिवस रोलर कोस्टरसारखे होते ज्यात खूप भावना आणि अनेक सुंदर भावना होत्या.

माझे स्वप्नातील घर पाहिल्यावर मला खूप धन्य वाटते. धन्यवाद, मला माझ्या स्वप्नातील घर दिल्याबद्दल ज्याला आपण आपले आनंदी घर म्हणतो. पहिल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा प्रिय घर. या फोटोंमधील अभिनेत्रीला तिचे चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

Share this article