Close

लग्नाच्या काही वर्षातच विकी कतरिनाला वैतागला, म्हणाला ती नेहमीच चुका काढते(That’s Why Vicky Kaushal is Afraid of His Wife Katrina Kaif, Actor Told The Shocking Reason)

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल लग्नानंतरचे आपले व्यावसायिक जीवन सांभाळता सांभाळता एकमेकांसोबतचे वैवाहिक जीवनही गुण्या गोविंदाने घालवत आहेत. ग्लॅमर इंडस्ट्रीतील रोमँटिक जोडप्यांपैकी एक असलेल्या कतरिना आणि विकीच्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी चाहत्यांना ऐकायला खूप आवडतात. विकी कौशल अनेकदा पत्नी कतरिना कैफ आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित मनोरंजक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने तो कतरिनाला घाबरतो असे सांगितले आहे. सोबतच त्याने त्याच्या घाबरण्याचे कारणही सांगितले.

कतरिना आणि विकी अनेकदा त्यांच्या रोमान्स आणि जबरदस्त बाँडिंगने सर्वांना आश्चर्यचकित करतात. सध्या विकी कौशल त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाते प्रमोशन करत असताना विकी कौशलने त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते.
आपल्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित एक किस्सा शेअर करताना, अभिनेत्याने सांगितले की त्याची पत्नी कतरिना कैफला त्याचे डान्स रिहर्सलचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. विकीने म्हणाला की, कतरिनाला माझ्या डान्स रिहर्सलचे व्हिडिओ पाहायला आवडतात. जेव्हा मी गाण्यासाठी शूटिंग करत असतो तेव्हा ती नेहमी मला माझ्या डान्स रिहर्सलचे व्हिडिओ विचारते.

अभिनेत्याने पुढे सांगितले की कतरिना कैफ एक अप्रतिम डान्सर आहे, त्यामुळे जेव्हा ती त्याचे डान्सचे व्हिडिओ पाहते तेव्हा तिला त्या व्हिडिओमध्ये अनेक कमतरता दिसतात. विकीच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे तो कतरिना कैफला घाबरतो आणि त्याला आपल्या डान्सचे व्हिडिओही तिला दाखवायला भीती वाटते.


विकीने सांगितले की जेव्हाही तो कतरिना कैफला त्याचा डान्स व्हिडिओ दाखवतो तेव्हा तो खूप घाबरतो कारण तिला त्याच्या डान्समध्ये ३६००० चुका आढळतात. अभिनेत्याने सांगितले की व्हिडिओ पाहिल्यानंतर ती म्हणायला सुरुवात करते की माझे पाय, माझे हात, माझे काही मुव्ह्ज् बरोबर नाहीत, त्यामुळे मी ते सुधारले पाहिजे. कतरिनाने बरेचदा आपल्या पतीच्या डान्समधील चुका शोधल्यामुळे तो तिला घाबरुन असतो.

Share this article