Close

बिपाशा बसूच्या लेकीचा अन्नप्राशन विधी संपन्न, चिमुकलीने नेसली होती बनारसी साडी(Bipasha Basu Celebrates Daughter Devi’s Mukhebhat Ceremony, Little Munchkin Look Super Cute In Red Bengali Saree)

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांचा आनंद घेत आहेत. ज्यावेळेपासून त्यांच्या घरी देवी जन्माला आली, तेव्हापासून ती त्यांचे विश्व बनली आहे. जोडपे सोशल मीडियावर अनेकदा आपल्या मुलीची सुंदर झलक दाखवत असतात. दरम्यान, बिपाशा आणि करणने मुलीचा अन्न प्राशन विधी भव्य पद्धतीने पार पाडला, ज्याची सुंदर झलक या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

बिपाशाने अन्न प्रशान विधी अतिशय पारंपारिक आणि संपूर्ण बंगाली रितीरिवाजात पूर्ण केला, ज्याचा एक व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, "देवीची मुखेभात. दुर्गा दुर्गा."

बिपाशाने प्रत्येक विधी भव्य पद्धतीने पार पाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशाने मुलीच्या खास दिवसाच्या सुंदर क्षणांची क्लिप समाविष्ट केली आहे. या फंक्शनमध्ये बिपाशा आणि करणचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी झाली होती.

या पारंपारिक सोहळ्यासाठी बिपाशा आणि करणने केवळ पारंपारिक पोशाखच घातले नाहीत तर त्यांनी देवीला बंगाली मुलीप्रमाणे सजवले. लाल रंगाची बनारसी साडी, सोन्याचे पैंजण, बंगाली मुकुट परिधान केलेली देवी खरोखरच बंगाली मुलीसारखी दिसत होती. बिपाशा बसूही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये बंगाली सुंदरीसारखी दिसत होती. तर, करण पांढरा कुर्ता-पायजमा आणि निळ्या नेहरू जॅकेटमध्ये दिसतोय. दोघांनीही प्रत्येक विधी कुटुंबासोबत पार पाडला, ज्याचे काही फोटो बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

बिपाशा बसूने 2016 मध्ये करण सिंह ग्रोवरशी लग्न केले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर त्यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. सध्या दोघेही मुलगी देवीसोबत वेळ घालवत आहेत आणि आई-वडील झाल्यामुळे खूप आनंदी आहेत.

Share this article