गौहर खान आणि जैद दरबार गेल्या महिन्यातच आईबाबा झाले आहेत. 10 मे रोजी, या जोडप्याने बाळाचे स्वागत केले होते. सध्या ते आई-वडील असल्याने खूप आनंदी आहेत. बाळ जन्माला आल्यापासून त्यांनी बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. पण आता त्यांचा मुलगा एक महिन्याचा झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. गौहर खानच्या या फॅमिली फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
गौहर खान आणि जैद दरबारने त्यांच्या इंस्टाग्रामवर दोन कौटुंबिक फोटो शेअर केली आहेत. फोटोंमध्ये गौहर जैद आपल्या बाळाला हातात धरून त्याकडे पाहत आहे. आई-वडील झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये त्यांचे बाळ खूप गोंडस दिसत आहे.
हे फोटो शेअर करण्यासोबतच त्यांनी मुलाचे नाव झेहान ठेवल्याचे सांगितले. कॅप्शनमध्ये जोडप्याने लिहिले- "आमचे बाळल. माशाअल्लाह तो एक महिन्याचा आहे. तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. त्याला तुमच्या अगणित प्रार्थनांची गरज आहे. तुम्हा सर्वांकडून विनंती आहे. आमच्या छोट्या आयुष्याची गोपनीयता अशीच जपा. हे आमचे जीवन आहे. झेहान कडून तुम्हा सर्वांवर प्रेम."
गौहरच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत आणि छोट्या राजकुमारवर खूप प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. या दोघांच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत. माही विजने लिहिले, 'हॅलो माय प्रिन्स.' तर सौंदर्या शर्मा त्याला 'कपकेक' म्हटले आहे. याशिवाय दीपिका कक्कर, करणवीर बोहरा, सुगंधा मिश्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही छोट्या झेहानवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
गौहर खान आणि जैद दरबार यांनी 10 मे ला बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली.