उडीद डाळीपासून बनवलेला दही वडा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. चला तर मग यावेळी रव्यापासून दही वडा बनवूया.
साहित्य :
• १ कप रवा • प्रत्येकी १/४-१/४ टीस्पून हिंग पावडर आणि बेकिंग सोडा
• १ हिरवी मिरची (चिरलेली) • १ इंच आल्याचा तुकडा (बारीक चिरून)
भाजलेले जिरेपूड, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ • अर्धा कप ताजे दही
• २ चमचे साखर • 2-2 चमचे चिंच-खजूर गोड चटणी
गोड दही आणि हिरवी चटणी
कृती :
• दह्यात साखर मिसळा आणि बाजूला ठेवा. एका भांड्यात रवा, हिंग, हिरवी मिरची, दही, आले, अर्धी वाटी पाणी आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.
• झाकण ठेवून २० मिनिटे ठेवा.
• बेकिंग सोडा मिक्स करून मध्यम आकाराचे गोळे बनवा आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.
• हे गोळे पाण्याने भरलेल्या भांड्यात २ मिनिटे बुडवून ठेवा आणि लगेच बाहेर काढा, नाहीतर गोळे फुटतील.
• गोळे हलके दाबून पाणी बाहेर काढा.
• गोळे ताटात ठेवा. गोड दही, हिरवी चटणी, गोड चटणी, भाजलेले जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ एकत्र करून सर्व्ह करा.