मँगो बासुंदी

साहित्य : 1 हापूस आंबा, 200 ग्रॅम दूध, 100 ग्रॅम साखर, 5 ग्रॅम बदाम, 5 ग्रॅम पिस्ता, 2 ग्रॅम वेलची पूड.
कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवा. दूध तळाला चिकटून नये म्हणून, सतत ढवळत राहा. दूध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा. त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी आणि साखर घाला. आमरसामध्ये दोन-तीन चमचे दूध एकत्र करून घ्या. साखर विरघळल्यानंतर दुधाच्या मिश्रणात हा आंब्याचा रस घाला. थोडा वेळ उकळवून, नंतर आच बंद करा आणि वेलची पूड घाला. आता ही बासुंदी थंड होऊ द्या. थंड झाली की, फ्रीजमध्ये किमान 3 ते 4 तास ठेवा. बासुंदी थंड झाली की, अजून दाट होते. थंडगार बासुंदी गरमागरम पुर्यांसोबत सर्व्ह करा.