सध्या विविध प्रकारच्या संसर्गानी प्रत्येक व्यक्ती पछाडली असल्याचे दिसून येत आहे. आपल्या अंगी रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने असे संसर्ग आपल्या शरीरात सहजपणे शिरतात. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी स्नायूंचे आरोग्य महत्त्वाचे असून स्नायू बळकट केल्यास ती वाढू शकते असे प्रतिपादन ॲबॉटच्या न्यूट्रिशन व्यवसायामधील मेडिकल व सायन्टीफिक प्रमुख डॉक्टर इरफान शेख यांनी केले आहे.
स्नायूंमुळे आपल्याला हालचाल करण्यास व संतुलन राखण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती कार्यान्वित करण्यात स्नायू महत्त्वाची भूमिका बजावतात. परिणामी विविध संसर्गांपासून आपले संरक्षण होते. तेव्हा ही स्नायू शक्ती वाढविण्यासाठी तीन सोपे मार्ग सुचविले आहेत.
१.नियमित व्यायामाने स्नायूशक्ती मजबूत करण्यासाठी दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. चालणे, पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग, पायऱ्या चढणे - उतरणे अशा साध्या कृतींनी हा व्यायाम घडेल. स्ट्रेच ब्रँड सह व्यायाम करा. दररोज एक तास असे व्यायाम केल्यास स्नायू शक्ती व एकूणच आरोग्य यांच्यात वाढ होईल.
स्नायू शक्ती मजबूत करण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. दररोज प्रतिभोजन २५ ते ३० ग्रॅम २.प्रथिनांचे सेवन केल्याने स्नायूशक्ती वाढू शकते. मांस, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, टोफू, बीन्स अशा पदार्थांमधून प्रथिने मिळवू शकता.
३.पौष्टिक घटकांची पूर्तता करा. प्रथिनांसह कॅल्शियम व जीवनसत्त्व ड असलेला आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. हिरव्या भाज्या, मासे, मशरूम्स व सोयाबीन यांचे सेवन करा. तसेच द्राक्षे, फुलकोबी यांचेही सेवन करा.
शरीराची ताकद आणि आपल्या आयुष्याला समाधानी बनविणारी दैनंदिन कामे करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी स्नायू आरोग्यदायी असणे महत्त्वाचे असते. योग्य पोषण व व्यायामाच्या संतुलनासह आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करण्यासाठी मेहनत घेतल्यास यांच्या आरोग्य उत्तम राहील व रोगप्रतिकारक शक्ती मिळू शकाल.