दिवाळी हा दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण. कोरोना नंतर पहिल्यांदाच हा इतका मोठा सण निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. बाजारपेठा देखील चांगल्या गजबजल्या आहेत. कारण दोन वर्षे अगदी शांततेत गेली. यावेळेस ग्राहकांचा खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. आकाशकंदीलला मागणी चांगली आहे. त्यात चायनीज पेक्षा जे स्वदेशी आकाशकंदील आहेत त्यांना मागणी जास्त आहे. खरं तर दुकानांच्या बाहेर, रस्तोरस्ती लटकवण्यात आलेले आकाशकंदिलच पहिल्यांदा दिवाळी आल्याची वार्ता देतात… बाजारात दरवर्षी नव्या डिझाइन्सचे कंदिल दाखल होत असतात. या आकाशकंदिलाच्या आकारात काय दडंलय ते माहीत आहे? चला जाणून घेऊया -
*चांदणीच्या आकाराच्या कंदिलातून चंचल स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारचा आकाशकंदिल बघणाऱ्याच्या माध्यमातून लगेच मध्य भागातून, पाताळातून ऊर्ध्व दिशेस प्रक्षेपित होणारा तमोगुण खेचला जाऊन स्वतःच्या विशिष्ट आकाराच्या बलावर वातावरणात प्रक्षेपित होतो.
*चौकोनी कंदिलातून सतत वलयांकित स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलातून तमोगुणी शक्ती, तमोगुणाचे प्रक्षेपण चौकोनी स्वरूपाचे कोष्टक स्वरूपाचे यंत्र बसवतात आणि त्या माध्यमातून वास्तूच्या चारही बाजू दूषित करतात.
*षट्कोनी आकाराच्या कंदिलातून समप्रमाणात तीन या घटकाशी संबंधित लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलाच्या सर्व ६ निगडित घटकांच्या सर्व ठिकाणी, बाजूस सतत तमोगुणी शक्तीचे प्रक्षेपण करणाऱ्या यंत्राद्वारे ऊर्ध्व दिशेतून अधर दिशेपर्यंत मोठ्या प्रमाणावर तमोगुणाचे प्रक्षेपण केले जाते.
*आकाशकंदिलाच्या विलक्षणात्मक आकारस्वरूपात शून्याशी निगडित लहरींना आकृष्ट करून त्यांना संचारणता प्रदान करून वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.
*आकाशकंदिलाच्या आकारकक्षेत सूक्ष्म शून्यात्मक पोकळीची निर्मिती होते आणि ती पोकळी दृश्य बंधनातून साकार होऊन कार्यदर्शकतेच्या अवस्थेत संचारते आणि सर्व दिशांना चक्राकार लहरींचे प्रक्षेपण होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय होते आणि कुटुंबातील लोकांना त्याचा लाभ होतो.
*आकाशकंदिलाजवळ इच्छा, क्रिया आणि ज्ञान या ईश्वराच्या शक्तीस्वरूपाचे दर्शक असणारी सूक्ष्म वलये निर्माण होतात. ही वलये वातावरणावर आवश्यक असा परिणाम करणारी असतात. ती ईश्वराची दर्शक असल्यामुळे समष्टीला पोषक असतात.
*आकाशकंदिलाच्या दोन्ही सपाट भागांतून सम प्रमाणात वलयांकित होत जाणाऱ्या चैतन्याने भारीत वलयांचे प्रक्षेपण होते. हे प्रक्षेपण म्हणजे सात्त्विकतेचा आविष्कार असतो. साधना परिणामकारकपणे व्हायला त्यांचा लाभ होतो.
आकाशकंदिलाची वैशिष्ट्ये
* प्रत्येक जिवाच्या जीवनात स्थूलातून आणि सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर करून त्याची उन्नती करून घेण्यासाठी ‘सात्त्विक आकाशकंदिल’ हे देवाने एक माध्यम म्हणून निर्माण केले आहे.
* जिवातील रज-तम गुण नष्ट करून सत्त्वगुण वाढविणारे ईश्वरी कृपेचे स्थूल माध्यम म्हणजे ‘सात्त्विक आकाशकंदिल’ होय.
* आकाशकंदिल घरी ठेवल्यावर घराची ०.२५ टक्के शुद्धी होते. आकाशकंदिल घरात ठेवल्यावर त्यात वायूमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरींचे आकर्षण होऊन वास्तूची काही प्रमाणात शुद्धी होते.
*आकाशकंदिल घराच्या बाहेरच्या बाजूस लावल्यास वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या ईश्वराच्या चक्राकार लहरींचे एकत्रिकरण होऊन त्यांचे घरावर कवचाच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे घरावर सूक्ष्म स्वरूपात संरक्षककवच निर्माण होते.
*दिवसा आकाशकंदिल ईश्वरी चैतन्य ग्रहण करून रात्री त्याचे प्रक्षेपण करतो. दिवसा केले जाणारे प्रक्षेपण हे ब्राह्मतेजाने भारीत असते, तर रात्री प्रक्षेपित करत असलेले तत्त्व हे क्षात्रतेजाने भारीत असते.
*घरात आकाशकंदिल लावल्यावर वायुमंडलात संचारत असलेल्या कनिष्ठ देवतांच्या लहरी त्याकडे आकर्षित होऊन त्या लहरींचा मोठा साठा निर्माण होतो. त्यातून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे शेजारच्या घराचीही काही प्रमाणात शुद्धी होते.
(सदर मजकूर – सनातन संस्थेच्या सौजन्याने)