Close

सलमान खानची गाजलेली प्रेमप्रकरणे (Love Affairs Of Salman Khan)

कबूल केल्याप्रमाणे सलमान खानने आपला 'राधे' हा चित्रपट ईदच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित केला. थिएटर्स मधून प्रदर्शित करणे शक्य नसल्याने त्याने तो डिजिटल मंचावरून प्रदर्शित केला. मात्र या चित्रपटाने अपेक्षाभंग केला असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये झाली आहे. टीकाकारांनी तर या चित्रपटावर सडकून टीका केली आहे. पण सलमानचे काय? बदनाम हुए, लेकीन ना तो हुआ; अशा मनोवृत्तीत तो सदैव असतो. अन्‌ चर्चेत राहिल्याचा आनंद घेतो. या निमित्ताने त्याच्या प्रेमप्रकरणांना उजाळा द्यावासा वाटतोय्‌. कारण या प्रेमप्रकरणांनी तो नेहमीच चर्चेत राहिला होता... त्याने लग्न केलेले नाही, पण लग्नाच्या चर्चेपर्यंत येऊन ठेपलेल्या त्याच्या प्रेमिकांची यादी मात्र मोठी आहे...

१.सलमान-संगीता बिजलानी
बॉलिवूडमध्ये संगीता बिजलानी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती, असं मानलं जातं. सलमान, संगीताच्या प्रेमात पडला, तेव्हा ती त्याच्याहून अधिक पुढे गेला. या दोघांनी काही जाहिरातींसाठी एकत्र काम केलं होतं. तेव्हा ते एकमेकांशी जवळीक साधून बसले. संगीताने सलमानशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तो तयार नव्हता. त्यामुळे दोघांची फारकत झाली. विशेष म्हणजे या फारकतीनंतर दोघे एकमेकांचे दोस्त राहिले आहेत. पुढे संगीताने क्रिकेटपटू अझरुद्दीनशी विवाह केला, तरी तिची सलमानशी दोस्ती कायम आहे.

२.सलमान - सोमी अली
कराचीमध्ये जन्माला आलेली सोमी अली, सलमान खानवर इतकी फिदा झाली होती की, त्याला भेटण्यासाठी ती मुंबईला आली. त्यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती. मुंबईत आल्यावर सोमी अलीने आधी मॉडेलिंग व नंतर सिनेसृष्टीत काम केलं. अन्‌ ती सलमानच्या नजिक पोहोचली. दोघांचे प्रेम जमले. ते जवळपास ८ वर्षे एकमेकांशी डेट करत होते. या प्रेमकहाणीचा अंत देखील सोमीने लग्नाची मागणी घातल्यानेच झाला. हा सल्लूमियाँ आपल्याशी काही निकाह लावू इच्छित नाही, हे सोमीच्या लक्षात आले. अन्‌ ती फ्लोरिडाला निघून गेली.

३.सलमान - ऐश्वर्या राय
'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात सलमान व ऐश्वर्या राय एकत्र आले. सलमानच्या सर्व प्रेमकथांमधील ही सर्वाधिक लोकप्रिय कथा आहे. पण आपलं हे प्रेम सलमान सांभाळू शकला नाही. कारण तिच्या संबंधात तो इतका गुंतला होता की, तिच्यावर जरूरीपेक्षा जास्त मालकी हक्क गाजवू लागला. तो ऐश्वर्याला, हच का केलं, तेच का केलं म्हणून टोकत राहिला. ऐश्वर्या ज्या हिरोबरोबर काम करायची, त्याच्यावर तो संशय घ्यायचा. एकदा तर तो शाहरूख खानच्या 'चलते चलते' चित्रपटाच्या सेटवर गेला व तिथे गोंधळ घातला. सलमानच्या सांगण्यावरून शाहरूखने ऐश्वर्याला त्या सिनेमातून काढून टाकलं. मिळालेल्या वृत्तानुसार एकदा मध्यरात्री सलमान, ऐश्वर्या राहत असलेल्या बिल्डिंगपाशी गेला. नशेच्या अंमलाखाली असलेल्या या हिरोने तिचा दरवाजा ठोठावला. असंही म्हटलं जातं की, त्याने ऐश्वर्याला मारझोड केली व तिच्या वडिलांशी पण गैरवर्तन केलं. ऐश्वर्याची सहनशक्ती संपली अन्‌ तिने सलमानशी संबंध तोडले. असं म्हटलं जातं की, सलमानने ऐश्वर्यावर खरंखुरं प्रेम केलं होतं. नंतर त्याला आपल्या कृत्यांचा पश्चाताप झाला व तोवर तो तिला गमावून बसला होता.

४.सलमान - कतरीना कैफ
सलमानशी भेट होण्यापूर्वी कतरीना कैफचे करिअर डळमळीत होतं. 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटात तिने सलमान सोबत काम केले, अन्‌ तिला खूप यश मिळाले. या दोघांच्या प्रेमाचे किस्से मिडियामध्ये खूपच प्रसिद्धीस पावले. दोघांच्या लग्नाच्या तारखा देखील कैक वेळा घोषित झाल्या. पण सलमान या प्रेमपुंगवाला संसार थाटायचा कुठे होता? अखेरीस कतरीनाने त्याच्यापासून फारकत घेतली.

५.सलमान - क्लॉडिया सिएल्सा
मॉडेल असलेली क्लॉडिया सिएल्सा थोडे दिवस सलमान खानच्या प्रेमपाशात अडकली होती. तिने एका चित्रपटात अक्षयकुमार सोबत आयटम सॉन्ग पण केले होते.

६.सलमान - झरीनखान
झरीन खानला बॉलिवूडमध्ये आणण्याचं श्रेय सलमान खानकडेच जातं. 'वीर' या चित्रपटादरम्यान हे दोघे खूपच निकट आले होते.

७. सलमान - डेझी शाह
'जय हो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान व डेझी शहा यांची जवळीक वाढली. त्याने डेझीला आपल्याच चित्रपटातून पदार्पणाची संधी दिली होती.

८.सलमान - एमी जॅक्सन
प्रतीक बब्बरची गर्ल फ्रेंड असलेल्या एमी जॅक्सनचे नाव पुढे सलमान खानशी जोडलं गेलं. सलमानच्या निर्मितीसंस्थेच्या एका चित्रपटात एमीला नायिकेची संधी दिली गेली होती.

९.सलमान- स्नेहा उल्लाळ
ऐश्वर्या रायसारखी दिसते म्हणून स्नेहा उल्लाळचे रुप गाजले होते. सलमान खानशी तिचेही नाव जोडले गेले. 'लकी' या चित्रपटाद्वारे सलमान आणि स्नेहा एकत्र आले. पण हे संबंध जास्त दिवस टिकले नाहीत.

१०. सलमान - लुलिया वंतूर
विचित्र नाव असलेली परदेशी कलावती लुलिया वंतूर आणि सलमान खानच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा मधे रंगात आल्या होत्या. पण त्याच्या भ्रमरी स्वभावामुळे हेही प्रकरण लग्नापाशी येऊन थांबलं. अन्‌ पुढे संपुष्टात आलं.

Share this article