बॉलिवूडमधील काही कलाकारांना आपण फक्त त्यांच्या नावानंच ओळखतो, कारण हे कलाकार आपलं आडनाव लावतच नाहीत किंवा लपवू इच्छितात. रणवीर सिंह, गोविंदा, काजोल, रेखा, तब्बू… अशा सेलिब्रेटी आपल्या नावापुढे आडनाव का लावत नसतील? काय आहेत यांची आडनावं?
१. रणवीर सिंह
रणवीर सिंहचं पूर्ण नाव काय आहे, माहीत आहे का? रणवीर सिंह हेच पूर्ण नाव आहे असं वाटत असेल ना? पण त्याचं पूर्ण नाव रणवीर सिंह भावनानी असं आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर एवढं लांबच लांब नाव नको म्हणून त्यानं आपलं आडनाव काढूनच टाकलं.
२. काजोल
बॉलिवूडमधील हुशार अभिनेत्री आणि सिंघम अजय देवगनचीबायको काजोलही आपल्या नावापुढे आडनाव लावत नाही. काजोलचं पूर्ण नाव काजोल मुखर्जी आहे. अर्थात हे वडिलांकडचं आडनाव आहे. काजोल ही अभिनेत्री तनुजा आणि चित्रपट दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. परंतु, आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आईजवळ राहणाऱ्या काजोलने वडिलांचं आडनाव लावणं सोडून दिलं. तनुजाची मुलगी म्हणूनच तिला सर्व ओळखतात. तिच्या नावासोबत वडिलांचा उल्लेख क्वचितच होतो.
३. रेखा
नाकीडोळी अतिशय रेखीव बॉलिवूड अभिनेत्री रेखाचं पूर्ण नाव भानुरेखा गणेशन असं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी कदाचित तिला हे नाव मोठं आणि लक्षात ठेवण्यास कठिण जाईलसं वाटलं आणि तिनं नावातील भानू आणि आडनाव गणेशन असं दोन्हीही बाजूला केलं आणि ती बॉलिवूडची रेखा बनली.
४. गोविंदा
बॉलिवूडच्या राजा बाबू गोविंदाचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहूजा आहे. गोविंदा हे नाव नुसतंच गोड आणि छान वाटतं म्हणून त्याने फक्त नाव ठेवून आपलं आडनाव उडवलं.
५. असिन
बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्री असिनची खरी ओळख असिन थोट्टूमकल अशी आहे. तिचं आडनाव इतकं अवघड आहे की, सर्वजण त्याचा चुकीचा उच्चार करतात. याच कारणास्तव तिने आपलं आडनाव लावणं सोडून दिलं आहे.
६. तब्बू
बॉलिवूडमधील बुद्धीमान अभिनेत्री तब्बू म्हणजेच तब्बसुम हाशमी आहे. आडनाव न लिहिण्यामागे तिचे काही खास कारण नाही. आपलं नाव छोटं आणि लगेच घेता यावं यासाठी तिनं ते छोटं केलं. आता तिचे चाहतेही तिला तब्बू या नावानेच ओळखतात.
७. तमन्ना
बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना हिचं पूर्ण नाव तमन्ना भाटिया असं आहे. अंकज्योतिषानुसार तिचं नाव तिच्यासाठी लाभदायक आहे, म्हणून ती केवळ स्वतःचं नाव लावते आणि खरोखर असं केल्यानंतर तिला यशही मिळालं आहे.
८. जितेंद्र
बॉलिवूडमधील जम्पिंग जॅक जितेंद्रची खरी ओळख रवि कपूर अशी आहे. चित्रपटांसाठी त्याने नवीन नाव घेतल्यानंतर त्यापुढे आडनाव लिहिणंही त्यानं सोडून दिलं.
९. श्रीदेवी
बॉलिवूडमधील चुलबुली अभिनेत्री श्रीदेवीचं पूर्ण नाव श्रीअम्मा यांगर अयप्पन असे आहे.नाव उच्चारण्यास जरा कठिण तर आहेच शिवाय चित्रपटसृष्टीमध्ये हे नाव जरा विचित्र वाटलं असतं म्हणून तिने श्रीदेवी असं नाव घेऊन त्याच नावाने आपली ओळख कायम केली. या नावाने तिला यशही अमाप दिलं.
१०. शान
बॉलिवूडचा सुपरिचित गायक शानचं पूर्ण नाव शान्तनु मुखर्जी आहे. आपलं नाव शॉर्ट आणि स्वीट बनविण्याकरिता शान ने आपलं नाव लहान करून आडनाव बाजूलाच केलं. या छोट्याशा नावानं त्याची शान कमी न करता अधिकच वाढवली असं म्हणावयास हवं.
११. हेलन
बॉलिवूडमधील कुशल डान्सर आणि सुंदर अभिनेत्री हेलनला तिच्या हेलन एनन रिचर्डसन या खऱ्या नावानं कोणीही ओळखत नाही. एवढं मोठं नाव घेण्यास लोकांना त्रास पडू नये म्हणून तिनं आपलं आडनाव काढून टाकलं.
१२. धर्मेंद्र
धरम पा जी अर्थात धर्मेंद्रजींचंपूर्ण नाव धरम सिंह देओल आहे.बॉलिवूडमध्ये आल्यानंतर धरमजींनी आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकलं. परंतु त्यांच्या मुलांनी मात्र आडनावासहित बॉलिवूडमध्ये जम बसविला.