Close

ऐकावं ते नवलंच ! सकाळी उठताच कतरीनापासून दूर पळतो विकी कौशल (Vicky Kaushal runs away from wife Katrina Kaif After he wakes up in the morning, actor revealed interesting reason)

कतरिना कैफ आणि विकी कौशलची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक मानली जाते. देसी पंजाबी मुलगा अभिनेता विकी कौशल आणि परदेशी मुलगी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांनी लग्न करण्यापूर्वी एकमेकांना गुपचूप डेट केले होते, त्यानंतर शाही अंदाजात ते सात जन्माच्या पवित्र बंधनात बांधले गेले. लग्नानंतर दोघेही कामासह हॅपी मॅरीड लाईफ एन्जॉय करत आहेत. विकी कौशल अनेकदा त्याच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित मनोरंजक गोष्टी आपल्या चाहत्यांसह शेअर करतो. अलीकडेच अभिनेत्याने, तो सकाळी उठल्याबरोबर त्याची पत्नी कतरिना कैफपासून दूर पळतो असे सांगितले.

विकी कौशल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकीने त्याच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. अलीकडेच त्याने पत्नी कतरिना कैफबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलने सांगितले की, जेव्हा तो आणि कतरिना सकाळी उठतात तेव्हा ते पूर्णपणे वेगळे वेगळे राहतात. विकीच्या म्हणण्यानुसार, तो सकाळी कॉफी पिऊन आणि नाश्ता करून मगच कोणत्याही चर्चेत सहभागी होतो, तर कतरिना कैफ उठल्याबरोबर पूर्णपणे उत्साही असते आणि ती कोणत्याही गोष्टीत सहज गुंतून जाते. विकीने सांगितले की, सकाळी नाश्ता न करता कोणत्याही चर्चेत अडकू नये यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो.

याशिवाय विकीने आपल्या पत्नीचे रहस्य उघड केले की कतरिना आठवड्यातून एक दिवस सामान्य गृहिणी बनते. एखाद्या गृहिणीप्रमाणे ती घराच्या बजेटसाठी मीटिंग घेते. त्यावेळी तो खूप एन्जॉय करतो आणि सर्व काम सोडून पॉपकॉर्न घेऊन प्रेक्षकांप्रमाणे समोरील दृश्य पाहतो असे अभिनेत्याने सांगितले.

दुसरीकडे, जेव्हा विकीला विचारण्यात आले की पत्नी हेल्थ कॉन्शस असूनही पराठे खायला आवडतात का, तेव्हा तो म्हणाला की कतरिनाला तिच्या सासूने बनवलेला पराठा खायला आवडतो. त्याने सांगितले की आमचे लग्न पराठा वेड्स पॅनकेक्स आहे.

दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी एकमेकांना गुपचूप डेट केले होते. त्यांनी आपल्या नात्याबद्दल कोणालाही कळू दिले नाही आणि त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला फक्त खास मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

विकी कौशलचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' 2 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या सोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विकी लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे, तर कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे.

Share this article