महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित केल्यावर दिग्दर्शक केदार शिंदे, त्यांच्या बाईपण भारी देवा या मजेदार चित्रपटाच्या प्रचारात गुंतले आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत या चित्रपटाच्या शीर्षक गीताचे लॉन्च मुंबईच्या श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आले.
या सोहळ्याला केदार शिंदे यांच्यासह अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष हजर होते. या चित्रपटात सहा अभिनेत्री असून त्यांनी धमाल उडविली आहे, असं सांगण्यात आलं. रोहिणी – वंदना – दीपा – शिल्पा यांच्यासह सुकन्या मोने व सुचित्रा बांदेकर आहेत.
माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज् निर्मित या चित्रपटाचे बेला शिंदे व अजित भुरे सहनिर्माते आहेत. चित्रपट ३० जूनला प्रदर्शित होणार आहे.