Close

मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास दूर करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय (5 Simple Home Remedies To Relieve Menstrual Cramps)

दर महिन्याला येणारी मासिक पाळी आणि त्यामुळे होणारा त्रास यामुळे हैराण व्हायला होतं. काही महिलांना मासिक पाळी दरम्यान पोट दुखणे, हात-पाय दुखणे, अशक्तपणा वाटणे अशाप्रकारचे त्रास होतात.
उठणं-बसणंही नकोसं वाटतं. कोणतंही काम करण्यास उत्साह वाटत नाही.
पण काही घरगुती उपायांनी आपण हा त्रास कमी करू शकतो. यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करू शकतो. आपल्या आजींपासून वापरात असलेले हे उपाय सोपे आणि तितकेच परिणामकारक असतात. तेव्हा हे उपाय नक्की आजमावून पाहा.
  1. मासिक पाळीच्या बाबतीतील कोणत्याही त्रासावर उत्तम उपाय म्हणजे गरम पाणी पिणे. मासिक पाळी येण्याच्या दहा दिवस आधीपासून गरम पाणी पिण्यास सुरूवात करावी.
  2. मासिक पाळी दरम्यान त्रास होऊ नये म्हणून
    रात्री 8 ते 10 बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची साल काढून रिकाम्या पोटी त्यांचं सेवन करा.
  3. आळशी आणि राईची पावडर गरम करून त्याचा लेप कंबरेवर बांधून ठेवल्यास आराम मिळतो.
  4. 3 ग्रॅम आलं चेचून, 3 काळी मिरीची पुड आणि 1 मोठी वेलचीची पावडर, काळा चहा आणि दूध
    व पाणी एकत्र करून चांगलं उकळून घ्या.
    पाणी अर्धं झालं की आचेवरून उतरा.
    ते कोमट करून प्या. असं केल्याने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळेल.
  5. मासिक पाळी आली असताना जर कंबर दुखत असेल तर वडाचा चिक काढून त्याचा सकाळ-संध्याकाळ कंबरेवर लेप लावा.

Share this article