Close

ध्यानधारणेच्या 5 गैरसमजुती (5 Misconceptions About Meditation)

ध्यानधारणेबाबत अनेक जणांच्या मनात काही गैरसमजुती असतात. या गैरसमजुती दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न

गैरसमज
ध्यानधारणा केवळ ज्येष्ठांसाठी
अनेक तरुणांची आणि मध्यमवयीन लोकांची अशी समजूत असते की. ध्यानधारणा हे केवळ ज्येष्ठांसाठीच असते. तसे नसून ध्यानधारणा ही सर्व वयोगटातील लोकांसाठी फायद्याचे असते. 

गैरसमज
ध्यानधारणेने समस्या दूर
ध्यानधारणा केल्याने आयुष्यातील समस्या दूर होतात, असा अनेकांचा समज असतो. हा समज पूर्णपणे चुकीचा असून आयुष्यात आलेल्या समस्यांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाण्याची ताकद ध्यानधारणेने येते. याशिवाय कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याचे धैर्यही ध्यानधारणेमुळे येते.

गैरसमज
ध्यानधारणेमुळे संमोहित
असा समज आहे की, ध्यानधारणेमुळे आपण स्वत:ला संमोहित करतो. हा समज खोटा असून ध्यानधारणेमुळे स्वत:वर नियंत्रण राहते. संमोहित होण्यापासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच शरीराचे शुद्धीकरण होते.

गैरसमज
ध्यानधारणा म्हणजे एकाग्रता
ध्यानधारणा म्हणजे एकाग्रता. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ध्यानस्थ अवस्थेत राहिल्याने मनाला विश्राम मिळतो. त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. तर एकाग्र होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.

गैरसमज
ध्यानधारणा म्हणजे अध्यात्माची वाट
बर्‍याच लोकांचा असा समज असतो की, ध्यानधारणा करणे म्हणजे अध्यात्माच्या वाटेवर जाणे होय. 
मात्र, तसे नसून ध्यानधारणेमुळे तुम्ही मनाने तणावरहित होता आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद लुटू शकता.

Share this article