सणासुदीच्या काळात साडी-ब्लाउजची जरा हटके फॅशन करा. तुम्ही इतरांत वेगळे आणि सर्वाधिक स्टायलिश दिसाल. ब्लाउजची फिटिंग आणि डिझाईन योग्य नसेल तर महागडी साडीही डल दिसते. त्यामुळे ब्लाउजच्या पॅटर्न आणि फिटिंगकडे विशेष लक्ष द्या. या नव्या स्टायलिश साडी-ब्लाउज डिझाईन्स अनुसरून बघाच. सुंदर दिसाल.
ब्लाउजचे हात (स्लीव्हस्) साडी आणि फिगरनुसार फुल, हाफ, थ्री-फोर्थ ठेवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्लीव्हलेस किंवा नूडल स्ट्रॅप, बेल स्लीव्ह, बटरफ्लाय, पफ स्लीव्हचे ब्लाउजही शिवून घेऊ शकता. हे पॅटर्न तुम्हाला स्टायलिश लुक देतील.
ब्लाउजच्या समोरची नेकलाइन साधारणपणे गोल, यू, व्ही, स्क्वेअर अशी असते.
ब्लाउजच्या मागे असलेल्या नेकलाइनमध्ये तुम्ही अनेक प्रयोग करू शकता, जसे की मानेला बंदिस्त, डीप नेक, हाय नेक, बोट नेक इत्यादी.
फोटो सौजन्य : नर्गिस