कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. अलीकडेच, कियाराने एका मुलाखतीत खुलासा पती सिद्धार्थ मल्होत्राच्या आईला म्हणजेच तिच्या सासूला लग्नानंतर कसे प्रभावित केले याबद्दल सांगितले.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. शेरशाह चित्रपटाच्या रिलीजनंतर, दोघांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, या जोडप्याने कधीही त्यांचे नाते अधिकृतपणे केले नव्हते. पण अचानक या वर्षाच्या सुरुवातीला सिद्धार्थ आणि कियाराने लग्न करून त्यांच्या चाहत्यांना खूश केले. बरेच दिवस चाहते त्यांच्या लग्नाच्या बातमीची वाट पाहत होते.
अलीकडेच, मिर्ची प्लसला दिलेल्या ताज्या मुलाखतीत, त्याने लग्नानंतर आपल्या सासूला कसे प्रभावित केले हे उघड केले. कियाराने सांगितले की तिची सासू म्हणजेच सिद्धार्थची आई नुकतीच दिल्लीहून मुंबईत आली होती आणि आता त्यांच्यासोबतच राहते. त्यांना पाणीपुरी खूप आवडते. मला हे मला आधीच माहीत होते.
मी त्यांना फक्त घरी बनवलेली पाणीपुरी खायला द्यायचे ठरवले. घरी मी आधीच सांगितले होते की आज पाणीपुरी बनवणार आहे. माझी ही कल्पना त्यांना आवडली आणि मग मी पाणीपुरी बनवताना त्यांना जो काही मस्का लावला... बस काय…त्या खूप खुश झाल्या.
7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील सूर्यगड येथे त्यांनी लग्न केले होते. या जोडप्याने लग्नासाठी फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. मुंबईत आल्यानंतर या जोडप्याने त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्र आणि सहकाऱ्यांसाठी एक मोठे रिसेप्शन आयोजित केले होते.