जोडीनं घ्या आनंद
जोडीदारापेक्षा चांगला फिटनेस पार्टनर कोण होऊ शकतो? या प्रकारे दोघांनाही फिटनेस राखता येईल, शिवाय सध्याच्या व्यग्र दिनचर्येत या निमित्ताने एकमेकांचा सहवासही लाभेल.
फिटनेसचं महत्त्वं पटतंय. त्यासाठी व्यायाम, वर्कआऊट्स करण्याची इच्छाही आहे. पण… ते करण्याचा कंटाळा ये तो.
जसं एकट्याने शॉपिंग करायला, हॉटेलिंग करायला नको वाटतं, तसंच एकट्याने व्यायाम करायलाही नकोच वाटतं! मात्र या समस्येवरही
तोडगा आहेच. तो म्हणजे, त्यासाठीही पार्टनर शोधायचा… आणि आपल्या जोडीदारापेक्षा चांगला फिटनेस पार्टनर कोण होऊ शकतो?
या प्रकारे दोघांनाही फिटनेस राखता येईल, शिवाय सध्याच्या व्यग्र दिनचर्येत या निमित्ताने एकमेकांचा सहवासही लाभेल. तेव्हा जोडीने व्यायाम करण्याचे हे 5 सोपे उपाय… करून तर पाहा!
- सकाळी लवकर उठा. आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन मोकळ्या मैदानात जा. किंवा घराच्या गच्चीवर जा. उगवती सूर्यकिरणे अंगावर घ्या. त्यातून शरीरास आवश्यक असे जीवनसत्त्व ड नैसर्गिकरीत्या मिळेल. तसेच जागच्या जागी उड्या मारा किंवा दोघांनी एकत्रपणे सूर्यनमस्कार घाला. येत नसतील तर शिकून घ्या. सूर्यनमस्काराइतका सर्वांगास व्यायाम देणारा दुसरा चांगला व्यायाम नाही.
- सकाळच्या शुद्ध, स्वच्छ हवेत दोघांनी मिळून सायकलीवर फेरफटका मारा. निव्वळ सायकल चालविणे काही दिवसांनी बोअरिंग वाटेल.
तेव्हा एकमेकांशी शर्यत लावा. त्यात जिंकणार्यासाठी बक्षीसही ठरवता येईल. - दोघे मिळून पोहायला जा. हे दररोज सकाळी शक्य झाले नाही,
तरी जमत असल्यास संध्याकाळी किंवा शनिवार-रविवारी सकाळी
जमवून घ्याच. पोहण्याचे वेगवेगळे प्रकार एकमेकांना शिकवा अथवा तिथेही शर्यत लावता येईल. - योगासने, प्राणायाम, विविध व्यायाम प्रकारही दोघांनी एकत्र करण्याजोगे आहेत. या गोष्टी येत नसतील, तर आधी त्याचे तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण घ्या. दोघांना हे प्रशिक्षण एकत्र घेता येईल. अन् मग घरच्या घरी दोघे मिळून योगासने, व्यायाम नियमितपणे करा. योगासनांनी शरीर फिट राहते. आरोग्य लाभते. अन् शरीरासोबतच मनही शुद्ध राहते.
- सगळ्यात सोपा आणि फायदेशीर व्यायाम म्हणजे चालणे. दोघांनी मिळून सकाळ-संध्याकाळ चालण्याचा सराव करा. कमीतकमी 30-40 मिनिटे जोडीने चाला. आधी हळू आणि
नंतर झपाझप चाला. मधूनच जॉगिंग करा. तुमच्या शरीराचा फिटनेस आपसूकच राहील.र